पोलीस आयुक्तांना थेट फोन लावून विचारले धारेवरचे प्रश्न!
महापौर श्रीचंद तेजवानी बनले ‘गेस्ट एडिटर’

* गुन्हेगारी वाढली नाही, राकेश ओलांचा दावा
अमरावती / 19 मार्च : ’मंडल’ मीडिया हाऊसने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ’गेस्ट एडिटर’ या अभिनव उपक्रमासाठी शहराचे महापौर श्रीचंद तेजवानी यांना आज आमंत्रित केले होते. सांध्य दैनिक अमरावती मंडल, मराठी दैनिक आपली मातृभूमि व मंडळ न्यूज चॅनल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या माध्यमांवर श्रीचंद तेजवानी एकदिवसीय संपादक होते. त्यांनी संपादक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमरावती महानगराचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्याशी संपादकाच्या भूमिकेतून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. श्री. ओला यांना फोन केल्यानंतर श्री. तेजवानी असं म्हणाले की, मी आता मंडळ मीडिया हाऊसच्या संपादक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी संपादक श्रीचंद तेजवानी बोलत आहे. अशी संवादाची सुरुवात झाल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश ओला यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी संपादक तेजवानी यांचे अभिनंदन केले.
संवादाच्या प्रारंभी पोलीस आयुक्तांना संपादक तेजवानी यांनी थेट प्रश्न केला की, शहराची वाहतूक समस्या आपण कशी हाताळत आहात? पोलीस आयुक्तांसाठी हा प्रश्न अपेक्षित असला तरी कुठल्याही पूर्वतयारीशिवाय त्यांनी संपादकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. पोलीस आयुक्त म्हणाले की, शहराची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे. मी असा विचार करत आहे की, ऑटोमॅटिक चालान कापणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर वाहन चालकांना आपसूक शिस्त लागेल. हा संवाद पुढे अधिक खोलवर गेला तेव्हा महापौरांनी दुसरा प्रश्न घातला. शहरामध्ये पार्किंगची अव्यवस्था आहे, लोकांना आपली वाहने लावायला अडचण जात आहे, यामागे अतिक्रमण हे कारण आहे. तसेच हॉकर्समुळेही पार्किंग व्यवस्था अडचणीत आली आहे, याबाबत आपण काय करणार आहात? या प्रश्नावर उत्तर देताना पोलीस आयुक्त राकेश ओला असं म्हणाले की, महानगरपालिका आयुक्त, महापौर व पोलीस आयुक्तालय यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढला जाईल.
संपादक तेजवानी यांनी आता आपला मोर्चा वाढत्या गुन्हेगारीकडे वळवला. त्यांनी पोलीस आयुक्तांना प्रश्न केला की, वाढत्या गुन्हेगारीवर तत्काळ उपाययोजना आपण कोणती करणार आहोत? त्यावर आयुक्तांनी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एखाद्या मुरलेल्या संपादकाप्रमाणे तेजवानी प्रश्नावर प्रश्न टाकत होते. पुढे त्यांचा प्रश्न असा होता की, नव्याने गुन्हेगारी वाढली आहे, अपराध वाढला आहे, असा लोकांमध्ये समज पसरला आहे, यावर आपले काय म्हणणे आहे? पोलीस आयुक्त या प्रश्नावर बोलताना खूप स्पष्टपणे म्हणाले की, अपराध वाढलेले नाहीत, उलट तपासाची गती वाढलेली आहे. अमली पदार्थाच्या तस्करीला रोखण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. नागरिकांशी संवाद व्हावा म्हणून तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहे. पोलीस आयुक्तांनी पोलिसांमार्फत केल्या जाणार्या उपक्रमाची व कामकाजाची माहिती




