भाजप शिक्षक आघाडीचे दुसरे संमेलन उत्साहात
शेखर भोयर आणि संगीता शिंदे एकवटले

* बावनकुळेंनी स्पष्ट केले उमेदवारीचे धोरण
अमरावती/20 एप्रिल- भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघातर्फे आयोजित विभागीय शिक्षक संमेलनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या संमेलनात शेखर भोयर आणि संगीता शिंदे हे दोघेही शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करत असून, त्यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, तोच निवडणूक लढवेल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आ. प्रताप अडसड, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, हरीश पिंपळे, केवलराम काळे, आ. रवी राणा, प्रवीण पोटे पाटील, डॉ. नितीन धांडे, शिवराय कुलकर्णी, किरण पातूरकर, जयंत डेहनकर, शेखर भोयर, संगीता शिंदे, डॉ. संजय तीर्थकर, अमोल ठाकरे, चेतन पवार हे उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका करत महिला आरक्षण विधेयकाबाबत खंत व्यक्त केली. काँग्रेसमुळे महिलांना सत्तेपासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. संमेलनात अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी प्रास्ताविक केले, तर जगदीश पाटील यांनी महासंघाची भूमिका मांडली. सुनील पाल आणि विजय गिल यांनी शिक्षकांचे मनोरंजन केले.




