आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून

अमरावती/5 जून: भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) दिल्लीसह देशभरातील सहा केंद्रांवर पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ई-काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 7 जून 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात संस्थेने ’हेल्थ कम्युनिकेशन’, ’मीडिया अँड कम्युनिकेशन गव्हर्नन्स’ आणि ’कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड ब्रँड मॅनेजमेंट’ या तीन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. हे नवे अभ्यासक्रम दिल्ली, अमरावती, ढेंकनाल, आयझॉल, जम्मू आणि कोट्टायम या शैक्षणिक केंद्रांवर उपलब्ध करून दिले आहेत. यासह इंग्रजी, हिंदी, रेडिओ आणि दूरदर्शन पत्रकारिता तसेच जाहिरात आणि जनसंपर्क या चार पारंपारिक पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेशही याच प्रक्रियेतून होणार आहेत. प्रवेशासाठी ’सीयूईटी-पीजी’ (उजटझ17) परीक्षेतील वैध गुण आणि पदवी परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्रवेश निश्चितीसाठी उमेदवारांना 20 हजार रुपये शुल्क भरावे लागणार असून, पहिल्या प्रवेशाची यादी 9 जून रोजी जाहीर केली जाईल.
प्रवेशाचे निकष-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी 1 ऑगस्ट 2026 पर्यंतची वयोमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 25 वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 28 वर्षे, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 30 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button