धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अमरावतीत मानाचा मुजरा

उपमहापौर सचिन भेंडे व नगरसेवकांकडून शौर्यगाथेचे स्मरण

अमरावती / 12 मार्च : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त, अमरावतीतील नवसारी येथील छत्रपती संभाजी चौकात उत्साहात अभिवादन करण्यात आले. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमा उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी युवा स्वाभिमान पार्टीचे गटनेते नाना आमले, नगरसेविका डव्होकेट प्रितीताई रेवणे, नगरसेवक योगेश विजयकर, नगरसेवक अवी काळे आणि नगरसेवक संदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शंभूराजांनी स्वराज्य रक्षणासाठी जे सोसले, तो त्याग प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम धगधगत राहील.

संबंधित बातम्या

Back to top button