दुधाच्या पैश्यावरुन घरगड्याला बेदम मारहाण

माहुली / 27 फेब्रुवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकतपुर गावात बुधवारी रात्री एका इमानी गड्याला दुधाच्या पैशांचा हिशोब विचारणे चांगलेच महागात पडले. आपल्या मालकाच्या घरी वर्षानुवर्षे राबणार्‍या गजानन गोपालराव हिवसे या तरुण कामगाराला शुल्लक वादातून मालक उत्तमराव मते याने लाकडी छडीने रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण केली. प्रामाणिकपणे काम करूनही मिळालेल्या या अमानुष वागणुकीमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, माहुली पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. नऊच्या सुमारास त्यांनी मालकाच्या वडिलांना दुधाच्या पैशांबाबत माहिती दिली. ’तुमच्या मुलाने दुधाचे पैसे घेतले आहेत,’ असे गजानन यांनी सहज सांगितले. हाच राग मनात धरून आरोपी उत्तमराव मते त्या ठिकाणी आले. इतकेच नव्हे तर, ’पुन्हा असे बोलल्यास तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली.

संबंधित बातम्या

Back to top button