भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा
भगवान महावीर बहुउद्देशीय समितीचे विशेष आयोजन

शेकडो जैन बांधवांचा उत्साही सहभाग
अमरावती/30 मार्च– भगवान महावीर बहुउद्देशीय समितीद्वारे आज सकाळी 9 वाजता दहिसाथ येथील रतन भवन येथून महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये भगवान महावीरांचा जयघोष करत शेकडो समाजबांधव आणि महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेचे विविध ठिकाणी भाविकांनी सरबत आणि थंड पाणी देऊन स्वागत केले. शोभायात्रेत सुंदर सजवलेल्या रथात भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. पारंपारिक पोशाखात सहभागी झालेले पुरुष आणि महिलांमुळे शोभायात्रेची शोभा वाढली होती.
रतन भवन येथून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा दहिसाथ, अंबागेट रोड, गांधी चौक, राजकमल, जयस्तंभ चौक, रायली प्लॉट येथील महावीर मंदिर, जवाहर गेट, भाजी बाजार येथून मार्गक्रमण करत षटखंडागम भवन, रतन भवन येथे पूर्ण झाली. सकाळी 10:30 वाजता सांगता झाल्यावर महावीर स्वामी जन्माभिषेक, अष्टक आणि आरती करण्यात आली. दुपारनंतर महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी अध्यक्ष प्रमोद बगत्रे, सचिव योगेश विटाळकर, चंद्रकांत मोदी, दिलीप नखाते, विजय चवरे, सुनील तिप्पट, किशोर नखाते, संजय विटाळकर, सजल जैन, निलेश कलमकर, निरंजन फुकटे, सुरेश डोलस, राजेंद्र बन्नोरे, सचिन संघई, मुकेश जैन, सोनू शैलेंद्र जैन, संदीप फुकटे, नितीन बन्नोरे, प्रदीप आग्रेकर, प्रशांत सावळकर, अनिल सावळकर, आनंद वारकरी, सुरेश भाग्यवंत, पंकज राहुल, विवेक फुलंबरकर, राजेंद्र शाह, अतुल कलमकर, प्रेमा खडके, स्मित संघई, उल्हास संघई, पद्म खडके, लता सुरेंद्र सिंघई, विवेक पुरुषोत्तम आलशेट, संगीता उल्हास क्षीरसागर, समता विजय चवरे, गौरीश, रिधीन, रोहित राहुल, रवींद्र सिंघई, सचिन सिंघई, संजीव सिंघई, निशिगंधा बंड, नितीन बडनेरकर, तृप्ती संदीप दानखेडे, रूपाली प्रशांत भागवतकर, आशुतोष रुईवाले, दीपक आप्पा गुलाब्कारी, ममता विटाळकर, शोभा काले, भालचंद्र वणे, नितीन बन्नोरे, आभा अनिल सिंघई, भारती संजय कान्हेर, रजतकीर्ती मोदी, प्रवीण फुलाडी, पल्लवी सावळकर, स्नेहल आहले, मनोहर लोखंडे, ममता विटाळकर, संजीवनी नखाते, प्रतिभा नखाते, कल्पना डोलस, संगीता तिप्पट, शशी सुभाषचंद्र जैन, सुज्ञा, मिलिंद महाजन, मीना राजेंद्र सावळकर, लता अनिल डोळे, समीक्षा संजय गुलवाडे, वैशाली बन्नोरे, मंजुषा बन्नोरे, मयुरी दीपक चौधरी, सरला सावरकर, सुहासिनी महाजन, पीयूष महाजन, मीना भाग्यवंत, सरिता चवरे, अरुण कान्हेर, डॉ. अतुल जैन, एड. नकुल फुलाडी, छाया गजानन चुंबळे, जीवन गोरे, दीपक भुसारी, गोरक्षनाथ मोरे, हर्षा रवींद्र तिप्पट, वैशाली कीर्ती देवळसी, विद्या गिल्लकर, सुलोचना गुलाब्कारी, नीता राजेंद्र तिप्पट, आशा रोड, अनिता फुलाडी, कोमल कलमकर, उत्कर्षा कलमकर, मनस्वी फुकटे यांच्यासह अनेक जैन बांधव उपस्थित होते. हे आयोजन प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराज आणि समाधी सम्राट आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न झाले.




