पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिरपेचात मानाचा तुरा
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मॅक्लिओड्स फार्मा’त 49 विद्यार्थ्यांची निवड

अमरावती / 8 फेब्रुवारी : पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप द्वारे संचलित,पी. आर.पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,अमरावती यांच्यातर्फे नुकताच कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स लि.’ या फार्मसी क्षेत्रातील, बहुराष्ट्रीय कंपनीने सहभाग घेतला. 170 हून अधिक देशांमध्ये जागतिक उपस्थिती असलेली ,ही एक प्रमुख जागतिक, उभ्या एकात्मिक औषध कंपनी आहे,ज्यामध्ये 22,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.या मुलाखतींसाठी डी फार्म, बी. फार्म आणि एम. फार्म यांसारख्या विविध शाखांतील आणि विविध महाविद्यालयातील उत्तीर्ण आणि अंतिम वर्षातील 450 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्वालिटी अश्युरन्स (ट-), क्वालिटी कंट्रोल (टउ) आणि प्रॉडक्शन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये, काम करण्याची संधी मिळणार आहे.
या ड्राईव्हमध्ये पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावतीच्या डी फार्म. ,बी फार्म. आणि एम फार्म च्या एकुण 49 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमात मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स लि.यांच्यातर्फे व्यवस्थापक मयंक जैन व इतर टेक्निकल एक्सपर्ट यांनी मार्गदर्शन केले .तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती रुईकर यांनी औषध निर्माण क्षेत्रातील संधी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले. पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती महाविद्यालयातर्फे दरवर्षी विद्यार्थ्याकरिता अशा प्रकारच्या कॅम्पस प्लेसमेंट करिता, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांना महाविद्यालयात आमंत्रित करते, व त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो.सदर कॅम्पस ड्राईव्ह चे नियोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. भूषण भोयर यांनी केले. तसेच कॅम्पस ड्राईव्हच्या यशस्वी आयोजनामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.




