30 जूनअखेर कर्जमाफीचा मुहूर्त हुकला
शेतकर्यांना 5 जुलैपासून मिळणार लाभ

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती
मुंबई/29 जून-राज्यातील शेतकर्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी (ऋरीाशीी ङेरप थरर्ळींशी) योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. 2019 मधील राहिलेल्या शेतकर्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. तसंच 2026च्या नवीन योजनेत 56 लाख 24 हजार शेतकर्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यापूर्वी 2009, 2017 आणि 2019 मध्येही राज्य सरकारने शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. दुसरीकडे राज्यातील 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती. दरम्यान, जूनअखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकर्यांना लाभ मिळेल, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम 230 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या (22 जून रोजी) दिवशी, विरोधी पक्षाच्या आमदारांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत आंदोलन केले. यावेळी शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि इतर अनेक नेत्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका करत शेतकर्यांचे 7/12 उतारे निर्दोष करा, अशा घोषणा मराठीतून दिल्या. तर राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकर्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणार्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्यांसाठी ’वन टाइम सेटलमेंट’ योजना लागू केली आहे. व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनविण्याचाप्रयत्न केला जात आहे. उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री व सहकारमंत्री यांचा समावेश असलेला मंत्रिगटही काम करत आहे, असे मंत्री पाटील म्हणाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी(21 जून रोजी) मुख्यमंत्री फडणवीस यांनीविरोधी पक्षावर टीका केली.




