2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही
ठाकरे बंधूंसमोर मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी

तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर
फडणवीसांना 2029 पर्यंत मुख्यमंत्री ठेवा- राज ठाकरे
मुंबई /29 ऑक्टोबर : राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात असे आशिष शेलार म्हणाले. पण आशिषजी 2019 पर्यंत उद्वजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला तेव्हा तेव्हा मी आलो. पण 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मी वाटच पाहत राहिलो असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमात शेवटचे भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत .आज तरी काहीही बोललो तरी प्रतिषटकार काही येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीसांना 2029 पर्यंत मुख्यमंत्री ठेवा- राज ठाकरे
प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. आशिष शेलार भाषणात म्हणाले की राज ठाकरेंनी बोलवलं की देवेंद्र फडणवीस नेहमी येतातच. हा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी आपल्या शैलीत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
मी मुख्यमंत्र्यांना बोलवलं की मुख्यमंत्री येतात याच्यापुढे मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येत जातील, असंत्यांचं म्हणणं आहे. पण 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, याबद्दल अजून काय सांगू, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. यानंतर ते म्हणाले की, आज महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. प्रशांत कुलकर्णी यांनी हे पुस्तक केलेलं आहे आणि सुदेश यांनी या ग्रंथाली तर्फे त्याचं प्रकाशन प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अशा प्रकारचं एक पुस्तक बनवायचं आणि त्याचे वेगवेगळे रेफरन्सस जमा करायचे उभे करायचे हे साधं, सोपं आणि सरळ काम नाही, असे त्यांनी सांगितले.





