यायचं असेल तर आमच्या पक्षात या

विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

पुणे /28 सप्टेंबर  : राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) पक्षाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या तसेच एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर मोठे व स्पष्ट विधान केले आहे.
बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रांताध्यक्षांनी एक वाक्य वापरले, ते बोलता बोलता असे बोलले की, आमच्यामध्ये काही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्पष्ट सांगतो की, ज्या चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष हा शक्तीशाली करणार. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आणि इतर चर्चांवर भाष्य करताना शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, पण तुम्ही आमच्या जवळआले तर नाही तर ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही आणि आमचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणूनच लढणार आहे. पक्षाच्या भूमिकेबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button