काँग्रेस बारामती पोटनिवडणूक लढवणार
बिनविरोध प्रस्तावाला हर्षवर्धन सपकाळांचा नकार

मुंबई/20 मार्च – महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून, येथे पोटनिवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. या जागेवर बिन विरोध निव डणूक व्हावी, अशी काही राज कीय पक्षांकडून मागणी कर ण्यात आली होती. मात्र, या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, काँग्रेसने या प्रस्तावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने नाही. अशा प्रकारची परंपरा राज्यात कधीही प्रस्थापित झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.बारामतीसह राहुरी मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. राहुरीतील भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने 23 एप्रिल रोजी मतदान जाहीर केले आहे.याआधी सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत इतर पक्षांनीही आदराने स्पर्धेतून दूर राहावे, असे आवाहन केले होते. तथापि, काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. लरीरारींळ-लू-शश्रशलींळेप या विषयावर अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये चर्चा करूनच घेतला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.




