राज्यात 51 हजार हेक्टरवर नुकसान

मुंबई /20 मार्च : राज्यात गत चार दिवसांत झालेल्या उन्हाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 16 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील विविध 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. राज्यभरात सुमारे 51,488.54 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.




