4 नोव्हेंबरपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात 5 हजार जमा होणार

कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई /25 ऑक्टोबर  : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य शासनाकडून बँक खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत थेट जमा केली जाणार आहे. यासाठी कोणतीही किचकट ई-केवायसी करण्याची गरज उरलेली नाही. 4 नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा विश्वास कृषी मंत्री दत्तापत्रेय भरणे यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीआधी जमा होणारी 5 हजार रूपयांची मदत राज्यातील 92 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. अ‍ॅसग्रीस्टॅक क्रमांकावरून शेतकर्‍यांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या मदतीसाठी शेतकर्‍यांना वेळखाऊ व किचकट ई-केवायसी करण्याची गरज नाही. यामुळे मदत मिळण्यात शेतकर्‍यांना कोणताही विलंब होणार नाही.पंचनामे करतानाच प्रत्येकाचाअ‍ॅतग्रीस्टॅक क्रमांक व बँक खात्याची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, असा विश्वास दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असून, ही रक्कम थेट खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील कॅबिनेट बैठकीनंतर हे जाहीर केले असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय पुढच्या आठवड्यात निघेल, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच, केंद्राच्या आपत्ती निवारणातून निधी प्राप्त झाल्यावर बाकीची नुकसान भरपाई वितरीत केली जाणार आहे. सध्या शासनाने प्रत्येक विभागाच्या निधीला 20 टक्क्यांची कात्री लावली असून, तो निधी दुष्काळाची मदत व दुष्काळ निवारणासाठी वापरला जाणार असल्याची माहितीही त्याांनी दिली.

Back to top button