कोरोना सारखं पुन्हा एकदा सज्ज रहावे लागेल

नवी दिल्ली/23 मार्च – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सद्या सुरु असून आज पंतप्रधान नरेेंद्र मोदींनी पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लोकसभेत आपल्या 25 मिनीटाच्या भाषणात महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेत बोलताना पीएम मोदींनी इरान, इस्त्रायल आणि अमेरिकेतील संघर्षाबाबत चित्ता व्यक्त केली.
मोदी म्हणाले सद्याच्या संघर्षाचे परिणाम दुर्गामी होणार असून त्यासाठी आम्हाला तयार रहावे लागले. एकजूट रहावे लागेल, आम्ही कोरोनाच्या वेळेस एकजुटीने अशा आव्हानाचा सामाना केला आहे. आता आम्हाला पुन्हा धिरोदत्ताने, संयमाने, शांतमनाने प्रत्येक कठिन परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे. पंतप्रधानाच्या या वक्तव्याचा गंभीर अर्थ असून येणार्‍या दिवसात भारताला पुन्हा कोरोना सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल असा अर्थ माध्यमांनी काढलेला आहे.
सध्या 6.5 दशलक्ष मेट्रिक टन साठा क्षमता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात आहे. प्रत्येक संभाव्य स्रोताकडून पुरवठा अविरत सुरू राहील, हे सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तेल, वायू आणि खते वाहून आणणार्‍या जहाजांचे भारतात सुरक्षित आगमन होईल, याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांशी संवाद साधत आहोत.
आमच्या कडे अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. अगदी त्या मागील काळातही, जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाला होता; तरीही, भारतातील शेतकर्‍यांना युरियाची एक गोणी 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली होती. या संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांपैकी एक म्हणजे देशात उन्हाळ्याच्या हंगामाची झालेली सुरुवात. आगामी काळात विजेची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. देशातील वीज निर्मिती केंद्रांवर कोळशाचा साठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीपासून ते वितरणापर्यंत-प्रणालीच्या प्रत्येक पैलूवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
भीषण अपघातात हिवरखेडचे दोन तरुण ठार
झाला. या अपघातात प्रज्वल आणि भूषण या दोन्ही तरुणांचा जागीच अंत झाला, तर ट्रक चालकाचाही मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ट्रकचा मदतनीस गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी बैतूल येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. संपूर्ण हिवरखेड परिसरातील जनमानस या घटनेने हळहळले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button