सर्जीकल स्ट्राईक हे दहशतवाद्यांना दिलेले निर्णायक प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट

नवी दिल्ली/27 सप्टेंबर  : 2016 मधील सर्जिकल स्ट्राईक हे दहशतवादी हल्ल्यांच्या वेदनेला भारताने दिलेले निर्णायक प्रत्युत्तर होते. त्यातून देशाच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवीन उदाहरण जगासमोर आले. आता भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत वाटचाल करत असून दहशतवादाचा सामना कठोरपणे आणि निर्णायकपणे केला जाईल, हे देशाने स्पष्ट केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मन की बातच्या 138व्या भागात नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइकला 10 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. दहशतवादामुळे भारताने दीर्घकाळ वेदना सहन केल्या आहेत. सर्जिकल स्ट्राइक हे त्याविरोधातील निर्णायक प्रत्युत्तर होते.
मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारताने आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला, तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. मोदी यांनी सांगितले की, आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणावर चालत आहे.
त्यांनी 2008 मधील दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोट आणि 26/11 मुंबई हल्ल्याचीही आठवण केली. तसेच 9/11 हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. पीडित कुटुंबीयांप्रति संवेदनाही व्यक्त केली. तसेच जनगणना हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 15 ऑगस्टलाही मी देशवासीयांना यासाठी आपलावेळ नक्की काढण्याचे आवाहन केले होते. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतः नोंदवण्याची ही सुविधा अतिशय सोपी आहे. आपण आपल्या मोबाइलवरूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता, असे त्यांनी सांगितले.

Back to top button