झारखंड विधानसभा गेटजवळ विद्यार्थ्यांवर लाठीचाज

विद्यार्थी नेता देवेंद्र रुग्णालयात दाखल

विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर करणे चुकीचे- राहुल गांधी

रांची /10 ऑगस्ट ; झारखंडमधील रांची येथे जेपीएससी-जेएसएससी परीक्षेतील हेराफेरीच्या विरोधात निदर्शने करणारे हजारो विद्यार्थी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटजवळ पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना गेटवरून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हलले नाहीत तेव्हा त्यांनी लाठीचार्ज करून त्यांना पळवून लावले.
यादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या. पोलिसांना दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या आणि चपला भिरकावल्या. सकाळी 10 वाजता हजारो विद्यार्थी जुन्या विधानसभा इमारतीजवळ जमले आणि त्यांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी कूच केले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी काटेरी तारांचे बॅरिकेड्स लावले होते; तिथे सुरक्षेची सहा-स्तरीय व्यवस्था करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी ’वॉटर कॅनन’चा (पाण्याच्या फवार्‍यांचा) वापर केला असता, काही विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढून नाचताना दिसले, तर काहींनी राष्ट्रगीत गायले. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
रम्यान, सीआयडीने (उखऊ) गझडउ चे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक केली आहे. 21 जुलै रोजी गझडउ कार्यालयावर धाड पडल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि सीआयडी त्यांची सतत चौकशी करत होती.
झारखंड झडउ-डडउ परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. देवेंद्रनाथ महतो यांच्यासह सहा विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत; विधानसभेच्या घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून आंदोलनस्थळी पोहोचले.भाजप नेते बाबूलाल मरांडी म्हणाले की, विद्यार्थी गेल्या 15-16 दिवसांपासून जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये धरणे आंदोलन आणि उपोषणावर आहेत. या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे: जेपीएससी आणि जेएसएससी द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांची सीबीआय चौकशी व्हावी.
विद्यार्थ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत. 2023 मध्ये 26,000 सहायक शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाने निकाल एकाच वेळी जाहीर केला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात आला. उमेदवार अजूनही उत्तरांच्या शोधात संघर्ष करत आहेत. सीजीएल परीक्षांमध्येही अशाच प्रकारच्या अनियमितता घडल्या होत्या.

संबंधित बातम्या

Back to top button