24 तासात राहुल गांधींना दोनदा घेतले ताब्यात

दिल्लीच्या जंतर-मंतरवर हाय होल्टेज ड्रामा

पोलिसांनी खासदारांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप

ज्ञानेश कुमारांविरोधात सलग दुसर्‍या दिवशीही आंदोलन

नवी दिल्ली/7 ऑक्टोबर  : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेक कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक झालीयय. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते खासदर राहुल गांधी आपल्या इतर खासदारासोबत जंतरमंतरकडे कूच केली. जंतरमंतरकडे जात असताना पोलिसांनी खासदारांना
रोखलं. त्यांच्या बसेस अडवल्या.
पोलिसांनी खासदारांच्या बस अडवल्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.
त्याच्या निषेधार्थ प्रियंका गांधी रस्त्यावर ठिय्या मांडला. पोलिसांनी खासदारांना मारहाण केल्यानं प्रियंका गांधी आक्रमक झाल्या असून त्या रस्त्यावर झोपून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींना खांद्यावर उचलून गाडीत कोंबलं.यामुळे जंतरमंतर परिसरात मोठा गदारोळ माजलाय.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या आवाहनानुसार, ’इंडिया’ आघाडीचे खासदार दिल्लीतील जनपथ येथील ’सागर रत्न’ रेस्टॉरंटमध्ये जमले होते. हे रेस्टॉरंट जंतरमंतरपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असल्याने त्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच तिथे सध्या बीएनएसएस च्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज रौद्ररुप धारण केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अचानक शेकडोच्या संख्येने एकत्र आलेल्या विरोधकांनी जंतरमंतरच्या दिशेने कूच केले. आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वर्तनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्‍या लोकप्रतिनिधींना आणि खासदारांना चुकीच्या पद्धतीने हटवले व मारहाण केली. पोलीस प्रशासनाने महिला व वरिष्ठ खासदारांशी अत्यंत गैरव्यवहार केला असा आरोप प्रियंका गांधींनी केलाय.रोखलं. त्यांच्या बसेस अडवल्या.पोलिसांनी खासदारांच्या बस अडवल्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.
त्याच्या निषेधार्थ प्रियंका गांधी रस्त्यावर ठिय्या मांडला. पोलिसांनी खासदारांना मारहाण केल्यानं प्रियंका गांधी आक्रमक झाल्या असून त्या रस्त्यावर झोपून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींना खांद्यावर उचलून गाडीत कोंबलं.यामुळे जंतरमंतर परिसरात मोठा गदारोळ माजलाय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या आवाहनानुसार, ’इंडिया’ आघाडीचे खासदार दिल्लीतील जनपथ येथील ’सागर रत्न’ रेस्टॉरंटमध्ये जमले होते. हे रेस्टॉरंट जंतरमंतरपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असल्याने त्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच तिथे सध्या बीएनएसएस च्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज रौद्ररुप धारण केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अचानक शेकडोच्या संख्येने एकत्र आलेल्या विरोधकांनी जंतरमंतरच्या दिशेने कूच केले. आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वर्तनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्‍या लोकप्रतिनिधींना आणि खासदारांना चुकीच्या पद्धतीने हटवले व मारहाण केली. पोलीस प्रशासनाने महिला व वरिष्ठ खासदारांशी अत्यंत गैरव्यवहार केला असा आरोप प्रियंका गांधींनी केलाय.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आंदोलनासाठी जंतर मंतरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. दोन तासांनी दिल्ली पोलिसांनी त्यांची सुटका केली. गेल्या 24 तासांत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दोनदा ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

आम्ही घाबरणार नाही : खर्गे
इंडिया अलायन्सचे सर्व मित्रपक्ष जंतर मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करतील आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे खर्गे म्हणाले. निवडणूक आयोग जे काही करत आहे, त्यामागे नरेंद्र मोदी आहेत. विरोधी पक्षांना एकत्र येऊन देशातील लोकांना हे सांगायचे आहे की त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि खासदारांवर कितीही खटले दाखल झाले तरी, ते घाबरणार नाहीत किंवा लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांपासून थांबणार नाहीत.

Back to top button