गर्भलिंग निदान करणार्या टोळीविरोधात मोक्का दाखल
डॉ. नीलम गोर्हे यांच्या मागणीची दखल

कोल्हापूर /25 ऑगस्ट : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्या 11 जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईचे विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी स्वागत केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह संपूर्ण पोलिस पथकाचे त्यांनी अभिनंदन केले. डॉ. गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस व आरोग्य अधिकार्यांची आढावा बैठक झाली होती. या बैठकीत गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपातामागे संघटित गुन्हेगारी आढळल्यास केवळ झउझछऊढ कायद्यांतर्गत कारवाई न करता मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करण्याच्या सूचना डॉ. गोर्हे यांनी दिल्या होत्या.
यानंतर करवीर तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 11 आरोपींच्या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार केला. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कायदेशीर निकषांची पडताळणी केल्यानंतर या कारवाईला मंजुरी दिली. गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकरणात राज्यातील ही पहिली मोक्का कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




