खोट्या अफवांना व भूलथापांना बळी पडू नये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आवाहन

अकोला /25 ऑगस्ट- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या खोट्या अफवा व दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.काही व्यक्तींकडून लाभार्थी महिलांना ज्या महिलांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, त्यांनी महा-आयडी कार्ड काढल्यास पैसे पुन्हा सुरू होतात, महा-आयडी कार्ड काढल्यामुळे घधउ पूर्ण होते, महा-आयडी कार्ड काढले नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे तसेच आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्यास लाभ तात्काळ सुरू होतो अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे.या प्रकारच्या खोट्या भूलथापा व अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पैसे देऊ नयेत किंवा वैयक्तिक व बँकिंग संबंधित माहिती, जढझ, आधार क्रमांक अथवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. योजनेबाबतची अधिकृत माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिकृत यंत्रणेकडून मिळणार्‍या माहितीलाच प्राधान्य द्यावे.लाभार्थी महिलांची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे आणि सोशल मीडिया, फोन कॉल किंवा इतर माध्यमातून मिळणार्‍या अपुर्‍या अथवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button