वारकरी नाटकाकरिता रसिक प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती

स्थानिक अंबापेठ मंडळाचा बहारदार सादरीकरण

अमरावती /24 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरू असून सोमवार दि. 24 रोजी अंबापेठ क्लब, अमरावती या संस्थेचे वारकरी हेड. डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर झाले. या नाटकाला प्रेक्षकांच्या उपस्थीने उच्चांक गाठला. नाटक सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृह रसिकांनी खचाखच भरले होते.
चंद्रकांत शिंदे, रिया मिते, रुचिता खेडकर, कौशल खंडेतोड, समृद्धी माहोरे, निर्मिती गणवीर, कल्याणी इंगोले, प्रा. डॉ. मनीष गायकवाड, किर्ती बहादूर, प्रा. डॉ. दिनेश खेडकर या मुख्य मुख्य भूमिका असलेल्या कलावंतांना सौम्य गोलाईतकर, हर्षल मानेकर, दिव्यांशू जोमे, डॉ. रेखा मम्मीवार, तेजल काळमेघ, जान्हवी अंबाडकर, गौरी देवढे, प्रतीक्षा वडनेरकर, श्रावणी सोनटक्के, राधिका पाखरे, ऋतुजा मेश्राम, वैष्णवी बनसोड, यशस्वी ढवक, अनुश्री शेटे, नालंदा डोंगरे यांनी साथ दिली. अनेक कलावंत असलेल्या या नाटकाची निर्मिती आणि नेपथ्य -प्रशांत देशपांडे यांचे आहे. पार्श्व संगीत – प्रथमेश पूर्भे आणि डॉ. अवंतिका मानकर,, प्रकाशयोजना – गायत्री गुडधे, रंगभूषा – प्रतीक्षा गुडधे आणि वेशभूषा – श्रद्धा पाटेकर तसेच सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश खेडकर आणि प्रा. डॉ. मनीष गायकवाड यांनी केली आहे. या नाट्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे गायन आणि वादन हे रसिकांचे समोर प्रत्यक्ष करण्यात आले. हे गायक आणि वादक म्हणजे डॉ. अवंतिका मानकर, ओम कराळे, श्रवण बोरबळ, सिद्धेश जोशी, पीयूष हेलमारे आणि आराध्य गायकवाड हे आहेत. एका वारकरी कुटुंबाचा गावातील जुना समृद्ध वाडा, या वाड्यातील मुलगा पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे या भारतमातेचे आणि भारतीयांचे रक्षणालाच वारी समजणारा कर्तव्यदक्ष अधिकारी तर त्याची पत्नी विठ्ठलाचे भक्तीत रममाण असलेली वारकरी आहे. पडदा उघडतो तो वारीला जाण्याचा दिवस असतो, पंडुरंगाच्या भक्ती – आराधनेत गुंग असलेले गावकरी तेथे जमलेले असतात आणि अशा वातावरणात पडदा उघडतो तेंव्हा दादामहराजांचे वाड्यात आगमन होते. त्यांच्या मागोमागच प्रवेश होतो तो पोलिस इन्स्पेक्टर राणोजीचा आणि सुरू होते नाट्य. रंगत जातो पती – पत्नी या दोन वारकर्‍या मधील संघर्ष. शेवटी ते दोघेही एकमेकातील विठल – रुख्माइला ओळखतात आणि निघते पंढरीच्या पांडुरंगाची वारी. डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आज या स्पर्धेला आवर्जून हजरी लावली. संस्थेचे अध्यक्ष मा . हर्षवर्धन देशमुख यांचे या प्रसंगी नाट्यपरिषद, शाखा अमरावती च्या वतीने सागर रघुवंशी, सुनील देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष ड. चंद्रशेखर डोरले यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. सांस्कृतिक कार्य मंत्री ड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये दि . 25 रोजी सरकार बहुउद्देशीय संस्थेचे निर्मित दशानन हे नाटक सादर होईल. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. या स्पर्धेकरिता तिकिटांचा दर अतिशय अल्प असणार आहे. अशी माहिती स्पर्धा समन्वयक विशाल फाटे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button