दक्षिण आफ्रिकेतली जी 20 परिषदेचा समारोप

भारताने मांडली संतुलित आणि प्रभावी भूमिका

जागतिक स्थैर्यासह विविध मुद्यांवर सहमती

जोहान्सबर्ग /23 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिकेतली जी-20 शिखर परिषद अमेरिकेच्या अनुपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या गोर्‍या आफ्रिकी नागरिकांवरच्या कथित छळाचा उल्लेख करत परिषदेवर बहिष्कार टाकला होता. पुढच्या वर्षीचे यजमानपद अमेरिकेकडे असूनही त्यांचा एकही अधिकृत प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हता.दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी पारंपरिकरित्या परिषद समाप्तीची घोषणा केली; मात्र यजमनापद पुढील अध्यक्ष देशाला हस्तांतरण करता आलं नाही. हा समारंभ आता नंतर होणार आहे. आफ्रिकन खंडावर पहिल्यांदाच झालेल्या या शिखर परिषदेत उद्घाटनाच्याच दिवशी घोषणापत्र जारी करून एक नवीन परंपरा रचली गेली. हवामान बदल, जागतिक संपत्ती असमानता, विकसनशील देशांवरचे कर्ज आणि हरित ऊर्जेच्या मुद्द्यांवर आधारित या दस्तऐवजाला बहुसंख्य सदस्य देशांचा ठाम पाठिंबा मिळाला.
भारताने या परिषदेत अत्यंत मोजके, संतुलित आणि दूरदर्शी नेतृत्व दाखवले. हवामान बदल, शाश्वत विकास, विकसनशील देशांसाठी आर्थिक मदत आणि जागतिक स्थैर्य यांसारख्या मुद्द्यांवर भारताने स्पष्ट भूमिका मांडली. तसंच ग्लोबल साऊथचा आवाज प्रभावीपणे उठवला.अमेरिका आणि अर्जेंटिनाच्या विरोधामुळे या बैठकीत काही वाद निर्माण झाले. तरी या शिखर परिषदेने आफ्रिका आणि आजूबाजूच्या देशांच्या भूमीकेला प्रथमच आंतरराष्ट्रीय मंचावर चांगले स्थान मिळाले.

संबंधित बातम्या

Back to top button