‘मत चोरी’ नंतर भाजपकडून उमेदवार चोरी

हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणविस सरकारवर गंभीर आरोप

अमरावती /20 नोव्हेंबर : चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवडून काय आले, अमरावतीची राजकीय तापमानच लालभडक झालं. या सगळ्या गदारोळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट पत्रकार परिषदेतून फडणवीस सरकारवर आरोपांचा बॉम्बस्फोटच केला.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, चिखलदर्‍यात आधी मत चोरी झाली आता तर सरळ उमेदवारांची चोरी चालू आहे! चिखलदर्‍यात राहातही नाही अशा लोकांची नावे मतदार यादीत टाकून भाजपचा गेम प्लॅन सुरू आहे. आणि या सगळ्यामागे फडणवीस यांच्या नातेवाइकांचा थेट हस्तक्षेप आहे! आणखी थरारक म्हणजे-काँग्रेसचे उमेदवार शेख इरशाद जमील आणि दोन अपक्ष उमेदवारांनी अचानक अर्ज मागे घेतले आणि तिथेच भाजप उमेदवार आल्हाद कलोतींचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
सपकाळ पुढे म्हणाले की, हे काही योगायोग नाही हे एकदम स्क्रिप्टेड ‘पॉलिटिकल वेब सीरीज’ आहे! त्यांनी थेट आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक मामेभाऊ धर्मादाय आयुक्त – जमीन व्यवहारात गुंतलेले आहे तर आता दुसर्‍या मामे भावाला नगरसेवक बनवून चिखलदर्‍याची जमीन ‘थेट-सेट’ करण्याची तयारी सुरू! झाली. विशेष म्हणजे ‘फॅमिली पॅकेज’ राजकारण! सपकाळांनी आणखी गंभीर आरोप केला.उमेदवारांवर दडपण धमक्या प्रलोभने आर्थिक सौदेबाजी आणि अगदी अपहरणाच्या घटनांपर्यंत गोष्ट आली. या सगळ्याचा ‘मुख्य सूत्रधार’ म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय. आता तर ते पूर्णपणे तानाशाही मोडमध्ये काम करत असल्याचेही पहायला मिळत आहेत, एवढच काय ही भाजपची गुंडागर्दी आता आम्ही अजिबात सहन करणार नाही! या सगळ्या आरोपांनंतर चिखलदरा- अमरावती राजकारणाचे तापमान मीटर फुल रेड झोनमध्ये पोहोचले आहे. पुढे काय स्फोटक परीवर्तन होणार हे अद्याप सांगता येणार नाही, कारण निवडणुक अजुन बाकी आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button