ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद

बच्चू कडूंचा घणाघात

मुंबई /10 नोव्हेंबर – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच, निवडणुकीपूर्वीच ईव्हीएम मशीनवरील विश्वासाचा प्रश्न पुन्हा डोकावू लागला आहे. मतदार याद्यांतील घोळ, मतांची चोरी आणि निवडणूक आयोगाची भूमिकेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी स्फोटक वक्तव्य करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ईव्हीएममधून मतांची चोरी करणारे नामर्दाची औलाद आहेत! लोकशाहीला लुबाडण्याचा हा प्रकार आहे. मतदारांच्या विश्वासावर पाणी फेरणार्‍यांना नामर्दाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कडू पुढे म्हणाले, ईव्हीएम मशीनमधून मतांची हेराफेरी होत असताना मतदार काहीच करू शकत नाही. आपण कोणाला मत दिले, ते खरोखर त्या उमेदवारालाच गेले का, हे तपासण्याची कोणतीच सोय नाही. मग ही कोणती पारदर्शकता? ही सगळी व्यवस्था म्हणजे नामर्दाचे काम आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप करत म्हटले, निवडणूक आयुक्तांना नोटांची गद्दी मिळाली असावी, म्हणूनच ही सगळी लफडी चालू आहेत. मतदारांच्या हक्कावर डाका टाकणार्‍यांविरुद्ध जनतेनेच उभं राहायला हवं. अन्यथा लोकशाही ही नावापुरतीच उरेल.ङ्गङ्गबच्चू कडूंच्या या वक्तव्याने विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका अधिक तीव्र केली आहे. प्रहार पक्षाकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याचे कडू यांनी सांगितले. प्रहारने जनतेसाठी, पारदर्शकतेसाठी आणि प्रामाणिक निवडणुकांसाठी लढा सुरू ठेवला आहे. आमच्या मतदारांवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.ङ्गङ्गत्यांनी पुढे इशारा दिला की, निवडणुकीच्या नावाखाली जर फसवणूक झाली तर प्रहार पक्ष रस्त्यावर उतरेल. लोकशाहीचा गळा घोटणार्‍यांना जनता क्षमा करणार नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. त्यात बच्चू कडू यांच्या या प्रखर विधानाने राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ईव्हीएमवर पुन्हा एकदा अविश्वासाचा वाद पेटला असून, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button