अमरावतीत 3 डिसेंबरला नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान

1.58 लाख मतदार करणार 11 नगराध्यक्ष व 208 नगरसेवकांची निवड

अमरावती /7 नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 2 नगर पंचायतींसाठी निवडणुकीची प्राक्क्रया सुरू झाली आहे. या निवडणुका 3 डिसेंबर रोजी पार पडणार असून 4 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
या निवडणुकीत एकूण 1 लाख 58 हजार 415 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी 77हजार 431 पुरुष आणि 81 हजार 06 महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण 11 नगराध्यक्ष व 208 नगरसेवकांची निवड या निवडणुकीत केली जाणार असून त्यापैकी 91 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. जिल्हा निवडणूक आधिकारी व जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निवडणूक तयारीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की मतदानासाठी 195 केंद्रे तयार करण्यात आली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 902 आधिकार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे.मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या एतच) तपासणीसह सर्व साहित्याची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मताधिकार बजावावा आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने मतदारांना केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button