निर्वाचन प्रमुख डेहनकर यांचा सत्कार

भाजपा शहराध्यक्ष धांडे यांच्याकडून

अमरावती / 7 नोव्हेंबर -आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांची पक्षाच्या वतीने निर्वाचन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीची माहिती मिळताच भाजपा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी डेहनकर यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला शहर महामंत्री बादल कुलकर्णी, ललित समदुरकर, माजी महापौर संजय नरवणे, माजी स्थायी समिती सभापती सचिन रासने, माजी गटनेते सुनील काळे तसेच पदाधिकारी राजू कुरील आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button