विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील एसीबीच्या जाळ्यात
41 हजारांच्या लाचेची मागणी

अमरावती/ 3 नोव्हेंबर : विद्युत प्रणालीचे काम दिल्यानंतर त्यासाठी अतिरीक्त पैश्याची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन चंद्रशेखर पाटील (35) यांना एसीबी च्या एका पथकाने लाचखोरीचा ठपका ठेवत अटक केली.
या कारवाईमुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. सविस्तर माहितीनुसार फिर्यादी हे शासकीय ठेकेदार आहेत. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग चे कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांना बुलढाणा जिल्ह्यातील विद्युत वितरण कंपनीचे काम मिळाले होते. विद्युत प्रणालीचेे काम झाल्यानंतर संबंधित ठेकेदार हे रोहन पाटील यांना भेटायला गेले. त्यावेळी ठेकेदार यांच्या माहितीनुसार 3 कामांसाठी 17 लाख 94 हजार रुपये होते. यासाठी आपल्याला 2 टक्के हिशोब अतिरीक्त द्यावा लागेल. याची एकुण रक्कम 35 हजार रुपये होत असल्याने ती वेगळी देण्यात यावी अशी मागणी लाचखोर पाटील यांनी ठेकेदाराकडे केली होती. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जुन्या शासकीय विश्राम गृहाच्या नुतनीकरणाच्या कामाची शासकीय मान्यता घेवुन जावी. ही माहिती संबंधित शासकीय ठेकेदाराने एसीबी कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी तक्रारीत नमुद केली. याअनुषंगाने एसीबीच्या अधिकार्यांनी अधिक तपास करीत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांना तीन्ही कामानिमित्त 35 हजार रुपये आणि शासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी 6 हजार रुपये असे एकुण 41 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली. त्याआधारावर एसीबीच्या अधिकार्यांनी सोमवार 3 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधिक्षक सुनिल किनगे व मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वात युवराज राठोड, वैभव जायले, चालक गोवर्धन नाईक यांच्या पथकाने विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी रोहन पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.




