आज बिझीलॅन्ड सहीत चारही मार्केट बंद

अमरावतीत सिंधी समाजाचा तीव्र निषेध

* इर्विन चौकात भव्य आंदोलन

अमरावती /3 नोव्हेंबर : रायपूर येथील अमित बघेल या व्यक्तीने सिंधी समाजाच्या इष्टदेवता झूलेलाल साई यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा अमरावतीतील सिंधी समाजाने तीव्र निषेध नोंदविला आहे. या निषेधाच्या पार्श्वभूमीवर 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता इर्विन चौक येथे भव्य आंदोलन आणि धरना आयोजित करण्यात आला आहे.संबंधित व्यक्तीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. श्रद्धास्थानाचा झालेला अपमान सहन न करता, संपूर्ण सिंधी समाज ‘एकता आणि श्रद्धेचा जयघोष’ करत रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखविली आहे.या आंदोलनाला शहरातील व्यापार्‍यांचा मोठा पाठिंबा मिळत असून, बिजीलेण्ड, सिटीलॅण्ड, ड्रीमलॅण्ड आणि मालू मार्केट या चार प्रमुख बाजारपेठांतील सर्व व्यापार्‍यांनी समाजाच्या ऐक्याला पाठिंबा दर्शवत आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सिंधी समाजाने प्रशासनाकडे संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली असून, शहरात जय झूलेलाल!च्या घोषणा घुमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बंदमध्ये समस्त व्यापारी बंधुनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून निषेध नोंदविण्याकरिता सहभागी व्हावे असे आवाहन संतोष सबलानी -अध्यक्षबंटी पारवानी -सचिवबिजिलेंड व्यापारी सामाजिक संगठनमुकेश हरवानी – अध्यक्ष मोहनलाल आहूजा- सचिव सिटीलैंड व्यापारी एसोसिएशन वासुदेव कृष्णानी -अध्यक्षमोहन केवलानी -सचिव ड्रीमलैंड असोसिएशनसुनील पमनानी – अध्यक्षबंटी भोजवानी सचिव नगमा फ्रॉक असोसिएशन आदि केले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button