राज्यातील व्याघ्र प्रकल्पात लागणार 900 कॅमेरे
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

-मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार
-मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
मुंबई / 12 जुलै: गेल्या काही वर्षांमध्ये वाघांचे प्रमाण वाढले आहे. शिकारीच्या शोधात हे वाघ मानवी वस्तीकडे येत असतात. यामुळे गेल्या काही काळात वाघाने अचानक हल्ला केल्याने जंगली भागात काही लोकांचा जीव गेलेला आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील व्याघ्र प्रकल्पात ए-आय बेस तंत्रज्ञयुक्त 900 कॅमेरे व्याघ्र प्रकल्पात लावले जाणार आहेत. यासाठी मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आपण जगातील आधुनिक तंत्रज्ञान घेत आहोत. आता 900 ठिकाणी कॅमेरे लावले जाणार असून यासोबच अलार्म असतील. ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच जंगल परिसरात हे कॅमेरे असणार आहेत. एखादा वाघ किंवा बिबट्या गावाकडे किंवा खाजगी जागेत दिसेल तेव्हा हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावातील अलार्म वाजेल. ही टेक्नॉलॉजी लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे. हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवहानी कमी होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, जंगलाला लागून असलेली शेतकर्यांची जमीन वन्य प्राण्यांमुळे पडीक पडलेली आहे. अशा शेतकर्यांना सरकार दरवर्षी 50 हजार रुपये एकरी प्रमाणे 30 वर्षांसाठी भाडे देणार आहे. या जमिनीवर वन विभाग सोलार प्रकल्प, बांबू लागवडीचे प्रकल्प, ग्रासलँड विकसित करणार आहे. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. याबाबत बोलताना राज्यमंत्री आशिष जैस्वाल म्हणाले की, या तंत्रज्ञानमुळे जंगल परिसरात वाघ किंवा बिबट्यांचा आवाज आला तर वन विभागाला अलर्ट पाठवा जाणार आहे, यामुळे गावकर्यांना सावध करता येणार आहे. यामुळे जीवितहानी कमी होईल. न्य प्राण्यांमुळे पडीक असलेली जंगल परिसरातील जमिन वन विभाग भाड्याने घेणार आहे, यासाठी शेतकर्यांना चांगले पैसे दिले जाणार आहेत. असे ते म्हणाले.




