दुष्काळग्रस्त शेतमजुरांना तात्काळ 2,500 रुपयांची मदत द्या
शिवसेनेचे अकोला जिल्हाधिकार्यांना निवेदन

अकोला/26 नोव्हेंबर : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीची कामे ठप्प होऊन हाताला काम नसल्याने अकोला जिल्ह्यासह राज्यातील शेतमजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या प्रत्येक शेतमजूर कुटु ंबाला शासनामार्फत तात्काळ किमान 2,500 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकार्यांकड े निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर 2026 रोजी हे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार, यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेती व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून दिलासा दिला असला, तरी शेतीचा अविभाज्य घटक असलेला आणि संपूर्ण जीवन केवळ मजुरीवर अवलंबून असलेला शेतमजूर वर्ग या मदतीपासून वंचित राहिला आहे. दुष्काळामुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतमजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर तीव्र आर्थिक टंचाई व उपासमारीची वेळ ओढवली आहे. शेतकर्यांप्रमाणेच शेतमजुरांचाही सहानुभूतीपूर्वक विचार होणे अत्यंत गरजेचे असून, त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह सुरळीत चालावा व त्यांना संकटातून सावरता यावे, यासाठी प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला किमान 2,500 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर शिवसेनेचे अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललित नानासाहेब वानखडे , शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, मंगेश काळे, , महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक,संतोष अनसाने यांच्या सहीने हे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करावा आणि निवेदन शासनापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर अंमलबजावणी व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी नगरसेवक सागर भरूका, नगरसेवक मनोज पाटील, सुरेखा काळे, नगरसेविका सोनाली सरोदे, देविदास बोदळे, संजय वाडकर,रामदास हरणे, आशिष सोनवणे, किरण शिरसाट, आशुतोष शेगोकार,मंगलाताई म्हैसने, सुनिता श्रीवास, संगीता सोनोणे, संतोष म्हैसने, सिंधुताई पवार, शितल गव्हाणे, जयश्री रघुनाथ तोरडमल, गजानन बोराळे, मंगेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली.





