तिरुपती बालाजी चरणी 121 किलो सोनं दान

मुंबई/26 नोव्हेंबर- तिरुपती बालाजी मंदिरात भाविक सोन्याची नाणी, मौल्यवान वस्तू यांच्यासह विविध भेटवस्तू किंवा दान अर्पण केले जाते. काही भाविक आपलं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात किलो-किलो सोनं किंवा चांदीही दान करतात. त्यामुळेच, देशभरातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. आता, चेन्नईतील एका व्यापार्‍याने तब्बल 121 किलो सोनं तिरुपती चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत 160 कोटी रुपये एवढी आहे. तिरुपती बालाजी चरणी तब्बल 121 किलो सोनं दान करणार्‍या उद्योगपतीचं नाव वर्धमान जैन असून त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि ऑटोमेशन क्षेत्रात आपले उद्योग उभारले आहेत. प्रामुख्याने ’अ‍ॅक्सेस हेल्थकेयर’ चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

Back to top button