सलग 3 वर्षे जमीन पडीक ठेवल्यास थेट सरकारजमा

जमीन खरेदी करून पडीक ठेवणार्‍यांनो सावधान; महसूलमंत्र्यांचे संकेत

महसूलमंत्री बावनकुळे यांचा बड्या व्यापार्‍यांना इशारा
शेतीच्या नावाखाली जमिनी अडकवणार्‍यांना चाप;
राज्य सरकारकडून कठोर नियमांची तयारी

मुंबई /22 नोव्हेंबर  :  शेती करायची म्हणून तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि शेती तशीच पडीक ठेवली असेल तर सावधान. कारण जमीन खरेदी करून वर्षानुवर्षे ती पडीत ठेवणार्‍या बड्या व्यापार्‍यांना आता सरकार देण्याच्या तयारीत आहे. सलग तीन वर्षे जमीन पडीक ठेवली तर ती जमीन सरकारजमा केली जाईल अशी तरतूद लागू करण्याबाबत राज्य सरकार विचारात आहे.हो, अगदी बरोबर तुम्ही वाचत आहात, राज्यात काही मोठे व्यापारी शेतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करतात; मात्र प्रत्यक्ष शेती न करता त्या जमिनी वर्षानुवर्षे पडीत ठेवत असतात. या प्रकारावर सरकारने लक्ष केंद्रित केलंय. नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जमीन पडीत ठेवता येत नसल्याचा उल्लेख करत, तीन वर्षे शेती केली नाही तर संबंधित जमीन सरकारजमा करण्याची तरतूद लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचं बावनकुळे म्हणालेत. पाऊस पुरेसा झाल्यास शेतकर्‍यांनीही जमीन पडीत न ठेवता शेती करावी,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुद्द याबाबत संकेत दिलेत. यासह नोंदणी विभागातील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक करण्याची तयारीही सरकारने केली. गोशाळांना 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि गोवंश संरक्षणासाठी कठोर कारवाईची भूमिकाही बावनकुळेंनी स्पष्ट केली होती. असे आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे शेतीच्या नावाखाली जमीन खरेदी करून तिचा शेतीसाठी वापर न करणार्‍यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील अधिकृत गोशाळांना 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आतापर्यंत सुमारे 700 गोशाळांची गोशाळा आयोगाकडे नोंदणी झाली. गोशाळांसाठी जमीन खरेदी, चार्‍याची व्यवस्था आणि गोवंशाच्या संगोपनासाठी येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांची विक्री होऊ नये आणि गोवंशाचे संरक्षण व्हावे, यासाठी सरकार व गोशाळा संयुक्तपणे काम करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
गोहत्या आणि गोतस्करी करणार्‍यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार आहे. गोहत्येच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने जनावरांची खरेदी करणार्‍यांवर मोक्का लावण्याबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमिती काम करत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

Back to top button