मक्तेदारीमुळे नोकर्या निर्माण होत नाहीत
नोटाबंदी-जीएसटीमुळे लहान व्यापारी उद्ध्वस्त

मोदींना राहुल गांधींचा जहरी टोला
नवी दिल्ली/20 नोव्हेंबर : नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे गुरुवारी (19 नोव्हेंबर) ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय उद्योगजगताला थेट सवाल करत करसवलतींचा फायदा कर्मचार्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. ज्यानंतर मोदींच्या या विधानावर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांनाच लक्ष्य केलं आहे. उद्योगपतींना सुनावताना मोदींनी सरकारच्या धोरणांचीच कबुली दिली, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. त्यामुळे आता मोदी विरुद्ध राहुल गांधी असा नवा राजकीय सामना रंगताना दिसतोय.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ऋखउउख च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगजगताला काही थेट प्रश्न विचारले. केंद्र सरकारने प्राप्तिकरात मोठी सवलत दिली. 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर करसवलत दिल्यानंतर कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांचे पगार वाढवले का? नवीन कर्मचार्यांची भरती केली का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मिश्कील टिप्पणीही केली. आज भारतात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. मला माहीत आहे, तुम्ही टाळ्या वाजवणार नाही. कारण तुमची भूकच अशी आहे की, तुम्हाला कितीही दिलं तरी तुमचं समाधान होत नाही, अशा शब्दांत मोदींनी उद्योगपतींना सुनावलं.लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदींच्या विधानावर पलटवार करत म्हटले आहे की, काल पंतप्रधान मोदी उद्योगपतींना टोमणा मारत होते – कर कमी केले, पण पगारही वाढले नाहीत आणि नोकर्याही निर्माण झाल्या नाहीत. मात्र मोदीजी, हा त्यांच्यावरचा आरोप नाही – ही तुमची कबुली आहे. तुम्ही म्हणता – भूक इतकी तीव्र आहे की ती भागवताही येत नाही. तुमचं बरोबर आहे. ही भूक कोणाची आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे. विमानतळं, बंदरे, खाणी, जंगलं, वीज, कोळसा, रस्ते – यांनी किती नोकर्या निर्माण केल्या? तुम्ही नोटाबंदी आणि सदोष जीएसटीने नोकर्या निर्माण करणारे छोटे उद्योग आणि एमएसएमई उद्ध्वस्त केले. आणि प्रामाणिकपणे स्पर्धा करणार्या मोठ्या कंपन्यांसाठी तुम्ही संधीच काढून टाकली. असे म्हटले आहे.तसेच, एकाधिकार नोकर्या निर्माण करत नाही. तो महागाई वाढवतो आणि स्पर्धा संपवतो. तुम्ही करा, आम्ही बघू? मोदीजी, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी लूटमार केली – देशाने ते पाहिलं आहे, आणि पाहत आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का? तुमच्या धोरणांमुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त गरीब व मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण यांपैकी कोणाकडेही टाळ्या वाजवण्यासारखे काहीही उरलेले नाही. तुमच्या उरलेल्या अनुयायांना टाळ्या वाजवायला आणि थाळ्या वाजवायला सांगा. असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. त्यामुळे आता त्यांच्या यो टोल्यावरून हा राजकीय वाद किती रंगतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





