63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द

रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध

मुंबई /17 नोव्हेंबर  : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील फायनान्स क्षेत्रात मोठी आणि धडक कारवाई करत एकाच झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. 16 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेद्वारे ने ही माहिती दिली आहे. या कारवाईअंतर्गत 49 नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे परवाने थेट रद्द करण्यात आले असून, हे आदेश 1 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पारित करण्यात आले होते. याशिवाय आणि 1 हाऊसिंग फायनान्स कंपनीने स्वतःहून आपले रजिस्ट्रेशन परत केले आहे. ठइख अधिनियम, 1934 च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. स्वतःहून परवाना परत करणार्‍या कंपन्या : एकूण 14 कंपन्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपले रजिस्ट्रेशन परत केले. यापैकी 6 कंपन्यांनीचा व्यवसाय बंद केला होता, 5 कंपन्यांना आता रजि स्ट्रेशनची आव श्यकता उरली नव्हती, तर 3 कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यामुळे किंवा त्या बंद पडल्यामुळे त्यांचे परवाने रद्द झाले. कामकाजावर बंदी : ने स्पष्ट केले आहे की, ज्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द झाले आहे, त्या यापुढे म्हणून कोणताही व्यवसाय करू शकणार नाहीत. म्हणजेच त्यांना कर्ज देणे किंवा फायनान्सशी संबंधित कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. जर तुम्ही कोणत्याही कंपनीकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमचा एखाद्या फायनान्स कंपनीशी आर्थिक व्यवहार सुरू असेल, तर अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी फायनान्स कंपनीच्या भूलथापांना बळी पडू नका. कर्ज घेण्यापूर्वी किंवा व्यवहार करण्यापूर्वीच्या अधिकृत वेबसाइटवर (rbi.org.in) जाऊन संबंधित कंपनीचे रजिस्ट्रेशन वैध आहे की रद्द झाले आहे.

Back to top button