ओम परब्रम्ह श्री राणा गणपतेश्वर बाबांचा रोप्य पुण्यतिथी सोहळा 22 नोव्हेंबरपासून

विविध समाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती /16 नोव्हेंबर : ओम श्री राणा गणपतेश्वर बहुऊदेशिय सेवा संस्था,इंदिरा नगर चांदुर रेल्वे द्वारा संचालित ओम परब्रम्ह श्री राणा गणपतेश्वर मंदिरात श्री.राणा गणपतेश्वर बाबांचा 25 व्या पुण्यतिथी सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 22 व 23 नोव्हेंबर रोजी मोठया उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. बाबांचा यावर्षो साजरा होणारा पुण्यतिथी सोहळा रोप्य महोत्सव म्हणून बाबांची निष्ठावंत भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करणार आहे. या सोहळ्या निमित्य संस्थानाने दिनांक 22 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबर ह्या दोन दिवसामध्ये विविध धार्मिक व समाजिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमांमध्ये स्वछता अभियान, ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना फळ व बिस्कीटाचे वाटप , मंदिर परिसरात फळ झाडांचे वृक्षारोपण, सायंकाळी ग्रामगिता प्रवचन ,सामुदायिक प्रार्थना व ध्यान तसेच भक्तिमय संगीत व भजनांजली व सायंकाळी 7 वाजता ह.भ.प. पांडुरंगजी कट्यारमल महाराज यांच्या कीर्तनाला सुरुवात होईल.तसेच दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11:45 ला वैकुंठ चतुर्दशी शुभ मुहूर्तावर बाबांनी देहत्याग केला होता .ह्या पावन दिवसाचे महात्म्य जाणून ह्याच दिवशी रात्री ठीक 11:45 वाजता बाबांच्या समाधीचे महाद्वार उघडून समाधीचे विधिवत पूजा अर्चा तसेच बाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून महाआरती केली जाते. हा भक्तिमय सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता बाबांच्या रामधून पालखीचे परिसरातून भ्रमन होईल व दुपारी 12:00 वाजता सोनी मराठी फेम ’ कोण बनणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ? ह्या कार्यक्रमात नामलौकिक प्राप्त ह.भ.प.पंकज महाराज पोहकार यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर दुपारी 1:30 वाजता महाप्रसादाला सुरवात होईल.

Back to top button