वृद्धाश्रमात गेल्या 35 वर्षापासून दिवाळीचा आनंदोत्सव
आझाद हिंद मंडळातर्फे मधुबन

अमरावती /12 नोव्हेंबर: स्थानिक आझाद हिंद मंडळ, बुधवारा, अमरावतीच्या वतीने मागील 35 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत मधुबन वृद्धाश्रमातील आजी आजोबा सोबत दिवाळी सण साजरी करण्याची परंपरा अखंडपणे सुरु आहे.दिवाळी हा आनंद, उत्साह आणी आपुलकीचा सण असून या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा या उदात्त हेतूने वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली जाते.आपल्या कुटुंबा पासून दुर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावर हास्य फुलवणे,त्यांना प्रेम जिव्हाळा आणी आपलेपणाची जाणीव निर्माण करून देणें, हा या उपक्रममागील पवित्र उद्देश आहे.
या प्रसंगी वृद्धाश्रमातील सर्व मातृशक्ती, पितृशक्ती यांना नविन कपडे व फराळाचे वितरण मान्यवाराच्या हस्ते करण्यात आले.तसेच गेल्या साडेतीन दशका पासून सुरु असलेला हा उपक्रम केवळ सण साजरा करण्या करीता मर्यादीत नसून तो माणुसकी, सामाजिक एकोपा आणी ज्येष्ठा प्रति आदर व्यक्त करणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. आझाद हिंद मंडळाने 35 वर्षा पासून जपलेली ही सामाजिक परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे खासदार मा.डॉ. अनिलजी बोन्डे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता तथा माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंतराव गुढे,शहर काँग्रेस अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. किशोर फुले,मंडळाचे सचिव दिलीप कालोती,मंडळाचे कोषाध्यक्ष तथा मधुबन वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप दाभाडे, मंडळाचे सहसचिव ज्ञानेश्वर हिवसे, संजय मुचळंबे, अजित वडवेकर, नंदकिशोर गुम्बळे, अनंत कौलगीकर, दिनकरराव काळे, जयंत देशपांडे,सुरेश रतावा,रेवण पुसतकर राजू भेले, संजय शिरभाते,अनिकेत ढेंगळे प्रमोद इंगोले, अर्जुन इंगोले, कु. पूजा इंगोले मराठा सेवा संघाचे श्री प्रकाश राऊत, मराठा फ्रेंड्स क्लब चे अध्यक्ष जगदीशनाना बोन्डे, प्रदीप वानखडे, डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले,गोपाल यादव, प्रभाकर वाळसे, शिवम हेगू मधुबन संस्थेच्या अध्यक्षा सौं. वसुधाताई बोन्डे, उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पोतदार,सदस्य प्रा. हेमंत मोहोड, डॉ.संगीता कडू, प्रा. अर्चना हिवसे, सौं. संगिता शिंदे (बोन्डे) वैश्य सोनार समाजाचे अध्यक्ष जयवंत राव राऊळकर, सचिव रविंद्र बिंड, माजी अध्यक्ष संजयजी भुताड, शेखरजी भुताड, अविनाश सपकाळ, नवरंग युवा क्रीडा मंडळाचे गजेंद्रसिंह ठाकूर, गणेश भाऊ ईश्वरकार,नितीन रहाटे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.अनेक मान्यवर उपस्थित होते.





