मेकअप आर्टिस्टच्या घरातून 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
गोरेगाव पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुंबई /12 नोव्हेंबर : राजधानी मुंबईत मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा आढळून आला असून बांगूरनगर पोलिसांनी कारवाई करत हा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या या ड्रग्जची बाजारभावाप्रमाणे किंमत 3.36 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गोरेगावमध्ये ड्रग्ज विक्रीसाठी तो आला असता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. उत्तर प्रदेशातील फुलचंद ईश्वरदयाल कश्यप या 31 वर्षीयआरोपीला अटक केली आहे. त्यानंतर, त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. तसेच, एकूण 21 कोटी 13 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मुंबईतील गोरेगावमध्ये बांगूरनगर पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवा केली असून तब्बल 3 कोटी 36 लाख रुपये किमतीचे 678 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फुलचंद ईश्वरदयाल कश्यप (वय 31 वर्षे) यास अटक केली असून तो मेकअप आर्टिस्ट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. गोरेगावच्या लिंक रोडवरील शिवम सोसायटीजवळ संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी, अंगझडतीत सहा ग्रॅम कोकेन आणि मोबाईल फोन आढळून आला. त्यानंतर, पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीच्या मालाडमधील मढ व्हिलेज येथील घरावर छापेमारी करण्यात आली. आरोपीच्या घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवलेला तब्बल 672 ग्रॅम कोकेनचा साठा जप्त केला. कोकेनसह मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 38 लाख 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून झटपट पैसे कमावण्यासाठी कोकेन विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती तपासात पुढे आली.





