माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला

सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य

नवी दिल्ली /12 नोव्हेंबर  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरुन सुरु असलेल्या चर्चांबाबत थेट भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, त्यानंतर तो विषय माझ्यासाठी तेव्हाच संपल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. आता विलिनीकरणावर अजून काही बोलायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं. विलिनीकरणाबाबत माझ्याशी कोणी बोललेलं नाही, मी तुम्हाला सांगू ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्यादिवशी, त्याच्यानंतर दोन चार दिवसात ज्या ही घटना झाल्या. त्याच्यानंतर मी स्वत: या विषयावर (विलिनीकरण) पडदा टाकलेला आहे. त्याच्यामुळं यावर वेगळं अजून काही बोलायचं काही कारण नाही,असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. पत्रकारांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम म्हणायचं का? यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळेंनी पूर्णविरामचा प्रश्न नाही, माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो (विलिनीकरण)विषय संपला, असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, दादा असताना चर्चा होती का होती. दादा माझ्याशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सगळ्यांशी बोलला होता का? तर बोलला होता. गोविंदबागेतील 17 जानेवारीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे, त्यात काय नवीन नाही, जगाला सगळं माहिती आहे. दादा आणि आम्ही काय करणार आहोत, हे संपूर्ण जगाला माहिती होतं. त्याच्यात फार लपवून ठेवलं असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर दादा असा अचानक निघून गेला, यानंतर माझ्याकडून त्याला पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ गेला विषय संपला काय बोलायचं अधिक असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

Back to top button