शरद पवार मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

मुंबई/4 नोव्हेंबर  : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांना सोमवारी कफाचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली. त्यांना पुढील तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button