टॉप कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी 25 लाखांचा रेट
सीईओपी प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा

रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
शिक्षण क्षेत्रात खळबळ
पुणे /3 नोव्हेंबर : राज्यातील प्रसिद्ध अशा उएजझ महाविद्यालयात म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरींग इन पुणे या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (3 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत याबाबतचा दावा केला आहे. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ सुद्धा दाखवला, ज्यामध्ये काही शिक्षकांनी परीक्षांमध्ये कशा प्रकारे गैरप्रकार आणि घोटाळा चालतो, याची सविस्तर माहिती दिली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये नारायण शिंगारे नावाच्या एका शिक्षकाने तर सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा रेट ठरलेला असल्याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. या खळबळजनक खुलाशांमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सीओईपीमधील घोटाळ्याची पत्रकार परिषदेतून माहिती देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, एर्वीीरिीज्ञ कंपनी केवळ राज्यात नाही तर देशातील अनेक ठिकाणी कामे करत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या काळात पहिल्यांदा काम देण्यात आले आहे. त्यानंतर आजपर्यंत हे काम सुरू आहेच. त्यानंतर चंद्रकांत पाटील, दिपक केसरकरपुन्हा चंद्रकांत पाटील असे मंत्री होते त्यांच्या काळात देखील याच कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कामे देणे सुरू आहे. एर्वीीरिीज्ञ नावाच्या कंपनीला 2 हजार 300 कोटी रुपयांची कामे देण्यात अली आहेत. 2 हजार 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या कंपनीने केला आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
यावेळी शिक्षक नारायण शिंगारे यांनी म्हटले की, इंजीनियरिंग कॉलजेमधे एडमिशन घेण्यासाठी सीईटी परीक्षा महत्वाची असते. या परीक्षेत घोटाळा होत आहे. याबाबत मी स्वतः एक स्टिंगऑपरेशन केलं आहे. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षणाची वाट लागली आहे. आम्हाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा पाहिजे. ही व्यक्ती पदावर राहाता कामा नये. ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. ही शिक्षण व्यवस्था किडलेली आहे. हे तात्काळ थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही लढा देखील लढणार आहोत. आम्ही स्थानिक पोलिस ठाण्यात गेलो, त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यानंतर एसआयटी टीमकडे गेलो त्यांनी देखील गुन्हा दाखल करुन घेतला नाही. सीईटीसाठी 25 लाख रुपयांचा रेट ते सांगत असल्याची माहिती देखील शिंगारे यांनी दिली.





