खंडारे परिवाराच्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ कार्यक्रम
आ.सुलभा खोडके यांची यांची उपस्थिती

अमरावती /1 नोव्हेंबर- शहरातील सर्वोदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड येथे चंद्रशेखर खंडारे परिवारातर्फे आयोजित बुद्ध पूजा व परित्राण पाठ कार्यक्रमाला आ.सुलभाताई खोडके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन करून बुद्धांच्या शांती, करुणा, मैत्री आणि मानवतेच्या महान विचारांना त्रिवार वंदन केले. या मंगलमय धार्मिक प्रसंगी त्यांनी खंडारे परिवारातील सदस्यांशी संवाद साधत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. भगवान गौतम बुद्धांचे विचार समाजात शांतता, बंधुभाव, समानता आणि सद्भावना वृद्धिंगत करणारे आहेत. बुद्धांच्या विचारांचा संदेश सर्वत्र पोहोचो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. समानता आणि मानवतेची शिकवण मिळते, असे प्रतिपादन आ.संजय खोडके यांनी यावेळी केले. या मंगलमय प्रसंगी त्यांनी खंडारे परिवाराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला चंद्रशेखर खंडारे, नम्रता खंडारे , उन्नती खंडारे परिसरातील नागरिक उपस्थित होते.





