तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरीचे भव्य आयोजन

प्रा.मोहन इंगळे प्रस्तुत दाभा पहूर येथे समाज प्रबोधनात्मक प्रस्तुती

अमरावती/30 ऑक्टोबर-महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती पूजन वर्षावास समापन व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त जाहीर व्याख्यानमाला आणि समाज प्रबोधनात्मक क्रांतिकारी बुद्ध भीम रमाई फुले छत्रपती शिव शाहू यांच्या जीवनकार्य यशोगाथेवरील समाज प्रबोधनात्मक आशय गर्भ निवेदनयुक्त संगीतमय गाण्यांचा , गझल, लोकगीत , पोवाडा, असा कार्यक्रम प्रबोधनकार पार्श्वगायक संगीतकार प्रा.मोहन इंगळे अमरावती हे आपल्या भावस्वरांजली संगीत ग्रुप सोबत रामजी सुभेदार बौद्ध विहार दाभा पहूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी सात वाजता प्रस्तुत करणार आहेत.
भावस्वरांजली ग्रुपचे डायरेक्टर सुप्रसिद्ध गायक प्रा मोहन इंगळे यांचे समवेत सर्व सुप्रसिद्ध कलावंत गायिका स्वामिनी सहारे तायडे निवेदक दिलीप सरदार ऑक्टो पॅड संतोष मानकर तबला विशाल पांडे ढोलक, ढोलकी, नाल ,संबळ ,दिमडी आकाश थोरात ऑर्गन विनोद वाटकर ध्वनी व्यवस्था धीरज बडगे गजानन वानखडे, वाहक ढोके इत्यादी कलावंत आपले सेवा देतील. या कार्यक्रमात भीम बुद्ध गाण्यांसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , लोकसंत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा , भगवान बिरसा मुंडा, तसेच महा कविवर्य वामनदादा कर्डक, प्रतापसिंग बोदडे ,सुकलाल,समदूर सारंग इत्यादी प्रबोधनकार कवींना आदरांजली त्यांनी लिहिलेल्या क्रांतिकारी गाण्याद्वारे प्रा. मोहन इंगळे आपल्या कलावंतासोबत गायन करून त्यांना मानवंदना देणार आहेत. बौद्ध उपासक, उपासिका पंचक्रोशीतील भीम अनुयायी शिव शाहू फुले बिरसा मुंडा परिवारातील संगीत प्रेमी रसिक जन यांनी वरील कार्यक्रमाचा आस्वाद आनंद घेण्याकरिता शुभ्र वस्त्र परिधान करून शिस्तीत व शांततेत उपस्थित राहण्याची कृपा करावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे सर्व आयोजकांतर्फे विनंती करण्यात येत आहे.

Back to top button