एअर इंडियाच्या अमरावतीत उड्डाण प्रशिक्षण संस्थेला डीजीसीएची मंजुरी

वर्षाला 180 वैमानिकांना प्रशिक्षण

मुंबई/30 ऑक्टोबर : एअर इंडियाला महाराष्ट्रातील अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरील एअर इंडिया उडडाण प्रशिक्षण संस्था (फ्लाइंग अकादमी) उभारण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातच वैमानिक प्रशिक्षण घेता येणार आहे. एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्था ही देशात भारतीय विमान कंपनीने स्थापन केलेली पहिली अकादमी आहे. वैमानिक प्रशिक्षणासाठी 31 सिंगल-इंजिन आणि तीन ट्विन-इंजिन विमानांचा ताफा चालविण्यात येणार आहे. वर्षाला 180 वैमानिकांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
भारतात हवाई वाहतुक झपाट्याने वाढत आहे. हवाई वाहतुकीचा विचार केला असता आर्थिक वर्ष 30 पर्यंत देशाचा विमान ताफा दुप्पट होणार आहे. पहिल्या व्यावसायिक उड्डाणापासून भारतीय विमान वाहतूक उद्योगाला 700 विमानांचा ताफा गाठायला सुमारे 90 वर्षे लागली. पण आता हवाई वाहतूक वाढीचा दर मोठा आहे. परिणामी विमान कंपन्या पुढील पाच-सात वर्षांत आणखी 600-700 विमानांची भर घालू शकतील.यामुळे मोठ्या संख्येने वैमानिकांची आवश्यकता भासणार आहे.अमरावती विमानतळावरील 10 एकर परिसरात पसरलेल्या या अकादमीमध्ये डिजिटल सुविधांनी युक्त वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था, एक डिजिटल ऑपरेशन्स सेंटर आणि एक समर्पित देखभाल सुविधा असणार आहे. एअर इंडिया फ्लाइंग अकादमी ही भारतातील विमानचालन क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करीत आहे. यामध्ये गुरुग्राममधील 6,00,000 चौरस फुटांच्या प्रशिक्षण अकादमीचा समावेश आहे. गुरुग्रामची अकादमी दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमानचालन प्रशिक्षण संस्था आहे.
1) भारताच्या बहुतांश भागापेक्षा उड्डाण प्रशिक्षण अकादमीची दृश्यमानता चांगली आहे. अमरावती विमानतळावर उड्डाण करण्यासाठी 300 दिवसांपेक्षा जास्त स्वच्छ दृश्यमानता.
2) इष्टतम हवाई जागेची उपलब्धता.
3) एमएडीसीने बांधलेली जागतिक दर्जाची धावपट्टी.
4) प्रशिक्षण मानके सुधारण्यास मदत होईल अशा उपकरणांच्या लँडिंगसह विमानतळ सक्षम
5) विमानतळ रात्रीच्या वेळी उतरण्याच्या क्षमतेने सुसज्ज

Back to top button