शरद पौर्णिमेच्या चांदण्यात अग्रवाल समाजाचा गरबा रंगला
कोजागिरीच्या उत्सवात कुटुंबांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध स्पर्धा आणि बक्षिसांनी वाढवली रंगत

अमरावती/26 ऑक्टोबर – शरद पौर्णिमेच्या चांदण्यात स्नेह, आनंद आणि उत्साहाची उधळण करीत अग्रवाल समाजाच्या वतीने कोजागिरी मिलन आणि रंगारंग रास गरब्याचे आयोजन करण्यात आले. अग्रवाल समाज, जागृती महिला मंडळ, अग्रवाल सखी मंच आणि अग्रवाल युवा संघटनेच्या संयुक्त सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विविध खेळ, आकर्षक बक्षिसे, महारास आणि पारितोषिक वितरणामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
शरद पौर्णिमेच्या अमृत चांदण्यात हा कार्यक्रम दिपार्चन राजापेठ मध्ये समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, सचिव अजय चौधरी, कोषाध्यक्ष अनिल मित्तल, महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रीती सराफ, सचिव उर्मिला केडिया, सखी मंचच्या अध्यक्षा ममता अग्रवाल, सचिव निर्मल अग्रवाल आणि युवा संघटनेचे अध्यक्ष कपिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. समाजाचे उपाध्यक्ष संजय अग्रवाल तलवेल, विनोद अग्रवाल सरकीवाले, माजी अध्यक्ष देवेंद्र अग्रवाल, गजेंद्र केडिया, मनीष केडिया, अशोक नांगलिया, मंजू ककरानिया, सावित्री जालान आणि रुची ककरानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राखी गोयंका, सर्वश्रेष्ठ युगल म्हणून मयूर केडिया-पायल केडिया, श्रेष्ठ जोडी म्हणून हितेश केडिया-श्वेता केडिया, उत्कृष्ट बालक म्हणून ध्रुव अग्रवाल आणि रिया अग्रवाल यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषेसाठी श्वेता गनेडीवाल, तर ऊर्जावान व्यक्तिमत्त्व म्हणून उषा अग्रवाल आणि कनक अग्रवाल यांना पुरस्कार देण्यात आले. महिला मंडळाच्या सरिता गोयंका, मीना केडिया, मंजू धामोरिया, प्रतीती अग्रवाल, समता केडिया, श्वेता केडिया, निकिता गोयंका, स्मिता केडिया, राजश्री केडिया आणि सखी मंचच्या कोमल अग्रवाल, मंजू केडिया, नीना अग्रवाल, रश्मी अग्रवाल, तरुलता अग्रवाल, भारती अग्रवाल, सीमा अग्रवाल, रमा नांगलिया, चंचल जालान, ऋतू लोहिया आणि स्मिता अग्रवाल यांनी आयोजनात पुढाकार घेतला. अनिल मित्तल, मनीष केडिया, सचिन मित्तल, विजय अग्रवाल, प्रवीण अग्रवाल आणि संजय अग्रवाल यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात लकी ड्रॉने झाली. पहिल्या पारितोषिकात 15 हजार रुपये किमतीची सफारी प्रवासी बॅग देण्यात आली. पुणम प्लायवूडने या बक्षिसाचे प्रायोजन केले होते. महिला, मुलांसह विविध वयोगटांसाठी खेळ घेण्यात आले. शरद पौर्णिमेनिमित्त महारासाचे आयोजनही करण्यात आले. गरबा आणि महारासात सहभागी झालेल्यांनी रंगीबेरंगी पोशाखांत ठेका धरला. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट पुरुष नर्तक म्हणून यश केडिया आणि उत्कृष्ट महिला नर्तकी म्हणून शीतल यांचा गौरव करण्यात आला. चविष्ट खाद्यपदार्थांसोबत केशरयुक्त दुधाचीही व्यवस्था करण्यात आली होती.





