शहरात 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

बुद्ध-भीम गीतांचा निनाद अन् गुणवंतांचा गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघाचा स्तुत्य उपक्रम

अमरावती /25 ऑक्टोबर : तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करीत येथे 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघ, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इर्विन येथे आयोजित या सोहळ्याला हजारो बौद्ध बांधवांसह भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धम्मदीक्षा सोहळा, बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम तसेच सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार यांमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नागपूर येथील दीक्षाभूमीवर अशोक विजयादशमीच्या ऐतिहासिक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेने भारतीय समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि सामाजिक न्यायाचा संदेश व्यापक केला. जातिभेद, विषमता आणि अन्यायाविरुध्द वैचारिक परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. याच ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करून तथागत गौतम बुद्ध यांचा प्रज्ञा, शील आणि करुणेचा विचार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधाननिष्ठ सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा आणि बाबासाहेबांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या संकल्पनेचा प्रसार करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. कार्यक्रमात बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. धम्मदीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून बौद्ध धम्मातील नैतिक मूल्ये, समता आणि मानवतेचा विचार अधोरेखित करण्यात आला. हजारो बौध्द बांधवांसह भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यात आला, तर धम्मदीक्षा सोहळ्याने धम्माच्या नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून सामाजिक विषमतेविरुद्धच्या संघर्षाचे आणि मानवी प्रतिष्ठेच्या जपणुकीचे प्रतीक आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, बंधुता, समानता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी बुद्ध-आंबेडकरी विचारांचे महत्त्व या सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समतेची जाणीव आणि परिवर्तनवादी चळवळीची मूल्ये समाजात रुजविण्याचा संदेश देण्यात आला. हजारो बौद्ध बांधव आणि महिला-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Back to top button