श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती चॅम्पियन
विद्यापीठाचा युवा महोत्सव ‘युवा संस्पर्श-2026’ चा उत्साहात समारोप

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सन्मान
अमरावती /8 ऑक्टोबर : आपले विद्यार्थी हेच खरे रत्न आणि हिरे असून त्यांना पैलू पाडण्याचे काम युवा महोत्सवाच्या माध्यमातून केले जाते, असे उद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव ’युवा संस्पर्श – 2026’ चा मोठएा उत्साहात समारोप झाला. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती हे ’युवा संस्पर्श – 2026’ चे चॅम्पियन ठरले. बक्षीस वितरण समारंभात कुलगुरू व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून गझलनवाज, मुंबई येथील श्री. भीमराव पांचाळे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनचे अध्यक्ष आ. धुपदराव सावळे, फाउंडेशनच्या सचिव सौ. कीर्तीताई प-हाड, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. जयंत पी. कावरे, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय एस. बोरकर, युवा महोत्सवाचे समन्वयक प्रा. प्रमोद काटकर, प्रा. मोहसीन खान, प्रा. पवन जगताप, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सुजित पाटील, द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या सचिव सौ. पद्माताई सावळे, डॉ. समीर पराड उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बारहाते पुढे म्हणाले, विद्याथ्र्यांच्या तयारीमागे प्राध्यापकांची आणि मार्गदर्शकांची अत्यंत मेहनत असते. महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांकडून त्यासाठी सातत्याने तालिम घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थी उत्तम प्रकारे सहभाग नोंदवू शकतील. कोणतीही स्पर्धा जिंकणे किंवा हरणे हा भाग असला, तरी त्यामागील जिद्द, चिकाटी आणि दररोजची तालिम महत्वाची असते. विद्याथ्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेतून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे. ज्यांना या वेळी यश मिळाले नाही, त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावेत आणि अधिक जोमाने सहभाग घेऊन यश प्राप्त करावे, असा मोलाचा सल्ला यावेळी कुलगुरूंनी विद्याथ्र्यांना दिला. युवा महोत्सवामध्ये अमरावती विभागातील 205 महाविद्यालयातील 5 हजार विद्याथ्र्यांनी 28 कलाप्रकारामध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले.





