पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्या ऑफीसवर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली/6 ऑक्टोबर   : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफिसवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (दि. 6) छापा टाकला. मुख्यमंत्र्यांचे अधिकारी (ओएसडी) राजबीर घुमन यांच्याशी संबंधित एका प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केल्यांचे वृत्त ’एएनआय’ने दिले आहे. चंदीगडमधील सेक्टर-2 स्थित 50 क्रमांकाच्या बंगल्यावर ही छापेमारी करण्यात आली असून, हेच ठिकाण मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिस म्हणून वापरले जाते.
रिपोर्टनुसार, सीबीआयचे पथक मान यांच्या् घरी पोहोचले. त्यांनी तपासणी सुरू केली. या छाप्यात कोणती कागदपत्रे किंवा इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि तपास यंत्रणेने या कारवाईबाबत अद्याप अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही

Back to top button