साखर कारखान्यांना 738 कोटींचे व्याज अनुदान

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई /15 सप्टेंबर : आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठीच्या सुलभ कर्ज (सॉफ्ट लोन) योजनेला मंगळवारी (15 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. साखर कारखान्यांना थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी तसेच आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारी साठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठीच्या 738 कोटी 51 लाख रुपयांच्या व्याज अनुदानासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयाचा लाभ राज्यातील 102 सहकारी साखर कारखान्यांना होईल. राज्यात 2025-26 मधील गाळप हंगामात 102 सहकारी साखर कारखान्यांनी 527.51 लाख मे. टन ऊस गाळप केले. मात्र साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती.

Back to top button