चिंतामणी गणपतीच्या आगमनाची तयारी

यावर्षी भव्य शोभायात्रेत पथक, दिंडी, हत्तीचा सहभाग राहणार

बालरूप श्रीरामाची मूर्ती ठरणार शोभायात्रेचे खास आकर्षण

अमरावती/11 सप्टेंबर– पन्नालाल नगर येथील स्वराज्य गणेशोत्सव मंडळात यंदा चिंतामणी गणपतीची स्थापना होणार असून सोमवार 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भव्य शोभायात्रेसह गणरायाचे आगमन होणार आहे. शोभायात्रेत पथक, दिंडी आणि हत्तीचा सहभाग राहणार असून अयोध्येतील बालरूप श्रीरामाची मूर्तीही मिरवणुकीत सहभागी केली जाणार आहे. त्यामुळे यंदाचा गणरायाचा आगमन सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
मंडळाचे मंथन तेलंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून युवक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचा यंदा सहावा गणेशोत्सव असून मंडळ आपल्या कल्पक सजावट आणि आकर्षक देखाव्यासाठी परिसरात परिचित आहे. यंदाही गणेशमूर्ती, सजावट आणि देखाव्याची विशेष तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विनायक काळे, श्रीकृष्ण घोंगडे, योगेश ठाकरे, प्रशांत खेटे, राहुल धर्माळे, रवी कहाले, मंगेश कहाले, नीतेश ठाकरे, प्रफुल्ल ठाकरे, प्रथमेश हेडा, मुन्ना हेडा, राजेश लुंगे, प्रथमेश खरपाटे, अंकुश रोडे, समर्थ वसु, आशु बांगर, अक्षय वडते, आयुष सोळंके, रुद्रेश कहाळे आणि वैभव ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गणरायाचे स्वागत करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Back to top button