कथित पोलिस हल्ल्याने युवक काँग्रेस आक्रमक

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील

दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहर युवक काँग्रेसची तीव्र निदर्शने

अमरावती /11 सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्यावर नागपूर येथे पोलिसांकडून कथितरीत्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेचा अमरावती युवक काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना देण्यात आले. दि. 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे नागपूर येथील संघ कार्यालयावर संविधानिक व लोकशाही मार्गाने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शिवराज दादा मोरे यांच्यावर नागपूर पोलिसांकडून कथितरीत्या जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या घटनेमुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे.लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर पोलिसी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला. सदर घटना नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडली, याची वस्तुनिष्ठ माहिती समोर येण्यासाठी घटनेची तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. उपलब्ध उउढत फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच इतर सर्व पुरावे तपासून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच श्री. शिवराज दादा मोरे यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून त्यांना शासकीय सुरक्षा प्रदान करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या-शिवराज मोरे यांच्यावरील कथित हल्ल्याची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी. दोषी आढळणार्‍यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. घटनेचे उउढत फुटेज व इतर उपलब्ध पुरावे तपासावेत. श्री. शिवराज दादा मोरे यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करून शासकीय सुरक्षा द्यावी. संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी. लोकशाही, संविधान आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणार्‍या महाराष्ट्रात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर दडपशाही होत असेल, तर ती गंभीर बाब आहे. या प्रकरणात सरकारने तातडीने कारवाई करावी; अन्यथा महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.निवेदन सादर करताना युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सरकार व पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट, एनएसयुआय शहराध्यक्ष स्वराज पोटे, एनएसयुआय प्रदेश सचिव वेदांत केने, सागर यादव, धनंजय बोबडे, शुभम हिवसे, कृणाल गावंडे, रोशन इंगळे, आकाश गेडाम, आकाश धुराटकर, चैतन्य गायकवाड, अनय वाटाणे, प्रियाल मोहोड, मोहीत भेंडे, कौस्तुभ देशमुख, श्रेयस धर्माळे, अभिषेक भोसले, साहिल वानरे, क्रिश बिसने, निशांत पवार हे युवक कॅांग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button