बाबरी ढाचा पाडताना अयोध्येत असल्याचा गर्व
रामजन्मभूमी आंदोलनात पहिल्यांदा अनुभवला गोळीबार

देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात युवकांशी संवाद
नागपूर/23 ऑगस्ट : राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नसून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे माध्यम असलेले मिशन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 1992 च्या अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात मी 20 वर्षांचा असतो सहभागी झालो. या आंदोलनादरम्यान गोळीबाराचा सामना करावा लागला आणि बदायू कारागृहात 18 दिवस राहावे लागले. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा आपण तेथे उपस्थित होतो आणि त्याचा मला गर्व आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जनमंथनतर्फे महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन 4 युवा नागपूर 2026’ अभियानाच्या समारोपप्रसंगी रेशीमबाग मैदानावर युवकांशीसंवाद साधताना फडणवीस बोलत होते.या कार्यक्रमाला क्रिकेटपटू तिलक वर्मा, अर्जुन पुरस्कार विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, थलेटिक्स पदकविजेता दिलीप गावीत, जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे, गो झीरोचे संस्थापक किरण शहा, क्रिकेट समालोचिका रिद्धीमा पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. युवकांच्या वाढत्या स्क्रीनटाइमवरही फडणवीस यांनी भाष्य केले. मुलांचा स्क्रीनटाइम कमी करावा लागेल. मुले मैदानावर दिसली पाहिजेत. स्क्रीनवर राहणे पूर्णपणे चुकीचे नाही; डिजिटल आणि ऑरेंज इकॉनॉमीमध्ये मोठ्या संधी आहेत. मात्र, त्यासाठी जीवनात संतुलन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




